Department of Marathi


About Department

पदवी-पदव्युत्तर मराठी विभाग

पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात महाविद्यालयाच्या स्थापना सन १९६२ पासून मराठी विभाग व सन१९८६ पासून पदव्युत्तर विभाग कार्यरत असून या विभागाचे तासगाव व तासगाव पंचक्रोशीत अतिशय महत्वपूर्ण योगदान आहे.शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक अशा चारही पातळीवर विविध उपक्रम राबवून विद्यार्थाचे मन, मेंदू आणि मनगट सामर्थ्यशाली करण्याचा प्रयत्न होताना आपणास येथे दिसतो.भाषिक आणि वाड:मयीन उद्दिष्टये साध्य करताना श्रवण, वाचन, भाषण, लेखन, रसग्रहणात्मक व सर्जनात्मक अनेक उपक्रम दरवर्षी राबवून विद्यार्थ्याचा व्यक्तिविकास साधला जातो.या विभागात संपर्क-जनसंपर्क कौशल्य कोर्स सुरु असून याचा विद्यार्थ्यांना चांगलाच फायदा होतो आहे.स्पर्धा परीक्षेतील मराठी- भाषा व्याकरण, कार्यशाळा चित्रपट निर्मिती कार्यशाळा, ग्रामीण साहित्य संमेलन, मराठी राजभाषा दिन समारंभ,लोकसंस्कृतीची आविष्कार रूपे या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र तसेच लोकसंस्कृतीची आविष्कार रूपे शोध पत्रिका बी,भाग दोन बदललेल्या आय. डी.एस. विषय कार्यशाळेचा शोध पत्रिका विशेषांक युवा स्पंदन विशेषांक असे महत्वाचे उपक्रम पार पडले आहेत.

पदवी-पदव्युत्तर विभागाचा विद्यापीठ परीक्षेचा निकाल नेहमीच ९०%पेक्षा अधिक असून कु.मेघा विठ्ठल माने ही मार्च २०१७ एम.ए.भाग.२च्या परीक्षेत शिवाजी विद्यापीठात सर्व प्रथम येऊन सुवर्णपदक तिने प्राप्त केलेच शिवाय इतर आठ पारितोषिके मिळवली. कु.मच्छगंधाली नितीन तारळेकर २०१७ मध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण केली. श्री लक्ष्मण किसन माळी हा २०१९ मध्ये नेट परीक्षा उत्तीर्ण झाला.प्रियांका विजय चव्हाण हिनें मार्च २०२० च्या विद्यापीठ परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकवले.

      मराठी विभागास विविध उपक्रम व कार्यक्रमाच्या निमिताने अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या त्यामध्ये दिवंगत चित्रपट निर्माते यशवंत भालकर, ग्रामीण लेखक आप्पासाहेब खोत,अविनाश हळबे, जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, शिवाजी विद्यापीठ अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ.दत्ता पाटील,विद्यापीठ अधि विभाग प्रमुख डॉ.रणधीर शिंदे ,डॉ.नंदकुमार मोरे. शिवीम अध्यक्ष डॉ.शिवकुमार सोनाळकर प्राचार्य डॉ.कृष्णा इंगोले जेष्ठ विचारवंत डॉ.बाबुराव गुरव.संस्था कार्याध्याक्ष मा.अभयकुमार साळुंखे साहेब, इ. मराठी विभागास प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे सरांचे मार्गदर्शन,सहकारी प्रा.डॉ. टी.के. बदामे प्रा.सौ.सरस्वती आंदेलवार याचे सहकार्य व मोलाची साथ विद्यार्थी विकासाला चालना देते.

 

Top

Style Options

Icon

Color Scheme

Show Top Bar

Show Hide

Layout

Wide Boxed

Dark & Light

Light Dark

Default Layout

Default